काही अनुभव....

प्राणिक हीलिंगमुळे पुनरुज्जीवन झाले.......

उर्वरित संपूर्ण आयुष्य बिछान्यात खितपत घालवायचं, हा विचारच अत्यंत भयानक होता. 11 सप्टेंबर 2008 रोजी नर्व्हब्लॉकच्या ट्रीटमेंटनंतर डॉक्टरांकडचे सर्व उपाय संपले होते आणि यापुढे कायम बेडरिडन रहावे लागेल असे तज्ज्ञांचे मत पडले. दहा वर्षांपूर्वी 28 डिसेंबर 1999 रोजी खुब्याच्या खाली मांडीचे हाड 1.50 इंच फ्रॅक्चर झाल्याने रॉड बसवून ऑपरेशन करण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबर 2003 मध्ये मांडी दुखावल्यामुळे 2 महिने गोळ्यांचा कोर्स घ्यावा लागला. 21 जुलै 2004 ला ऑपरेशन केल्या जागी असह्य वेदना होऊ लागल्या. त्यासाठी नर्व्ह ब्लॉक ट्रीटमेंट घेतली. 25 डिसेंबर 2005 रोजी पुन्हा वेदना सुरू झाल्या. पुन्हा नर्व्ह ब्लॉकट्रीटमेंट...... 1 सप्टेंबर 2006 मध्ये गुडघ्याखाली ट्रेस एन्ज्युरीमुळे फिजिओ थेरपी करून घेतली. दोन महिने बेडवर होते. औषधांचा हेवी डोस सुरू होता. नंतर बरे वाटले आणि शेवटचे म्हणजे वर्षभरापूर्वी 11 सप्टेंबर 2008 ला ऑपरेशन केलेल्या जागी खूप वेदना होऊ लागल्या म्हणून एक्स-रे काढला. तेव्हा खिळ्याभोवतालची हाडे भरून न आल्याने पोकळी निर्माण झालेली दिसून आली. यावर उपाय म्हणजे रि-ऑपरेशन करून प्लेट काढणे व सिमेंटिंग करणे, परंतु वयोमानाने हाडे ठिसूळ झाल्याने त्यानंतर ही उभे राहणे, चालणे शक्य होणार नाही, शेवटपर्यंत बेडवरच रहावे लागेल असे तज्ज्ञांचे मत झाले. त्या मुळे रि-ऑपरेशन केले नाही. ऐकल्यावर मोठा धक्का बसला. मनात आले-देवा, काय पाप केलं म्हणून असं दुसऱ्याला भारभूत होवून निरर्थक जगणं नशिबी आलं, बेमुदत जन्मठेपेची शिक्षा वाट्याला आली. आयुष्य किती आहे माहित नाही. वर्षानुवर्ष कशी काढायची ?काही सुचेना. डोकं सुन्न झालं. थोड्या दिवसांकरिता आपण समजू शकतो, पण कायमचं.... फारंच कठीण आहे. निराशेत, उदासीनतेत थोडे दिवस गेले, नंतर हळूहळू सावरले.... हे नशिबाचे भोग आहेत व ते कुणाला चुकत नाहीत, कमी जास्त प्रमाणात ते सर्वांनाच भोगावे लागतात हे कळून चुकले. त्याला तोंड कसे द्यायचे हे पहायचे. मोठा/गंभीर आजारनाही, बुद्धी, इंद्रिये कार्यक्षम आहेत हीच जमेची बाजू. मुख्य म्हणजे सेवा तत्पर जवळची माणसे आहेत. हे केवढे भाग्य !
मुळात शांत वृत्ती, अध्यात्मिक बैठक व सकारात्मक विचार सरणी असल्याने लवकरच सावरले. दिनक्रम ठरवला. जमेल तेवढा व्यायाम, योगासने, प्राणायाम, मिताहार, अध्यात्मिक व इतर वाचन, चिंतन, टीव्ही यात वेळ जायला लागला. मनात यायचं रोज नवीन-नवीन शोध लागतात, मला उपयोग होईल असा शोध लागेल का? आणि तो आपल्या आवाक्यात असेल का?आणि खरोखरच ईश कृपेने, गुरूकृपेने तो सोनियाचा दिवस आला. 9 मार्च 2009 रोजी "मुक्तपीठ"मध्ये निलिमाताईंचा प्राणिक हीलिंगवरील स्वानुभवकथनाचा लेख आला होता.वाचल्यावर आशेचा किरण दिसला. ही थेरपी (प्राणिक हीलिंग)आपल्याला उपयोगी पडेल असे वाटले. प्रयत्न करून पाहुया म्हणून ताईंशी संपर्क साधला. त्यांनीही तत्परतेने, मनापासून मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या उपचारकाशी संपर्क साधण्यास सुचविले. त्यानुसार त्यांना फोन करून माझा प्रॉब्लेम सांगितला. त्यावर त्यांनी "तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही नक्की बऱ्या व्हाल, चालू शकाल' असे सांगितले. त्यांचा तो आश्वासक स्वर ऐकूनच मन शांत झाले. कारण आत्तापर्यंत कोणीच असे सांगितले नव्हते. 20 एप्रिल 09 रोजी त्यांच्या सल्ल्याप्रमाणे उपचारांना सुरूवात झाली. चार दिवसांनं तर हालचालीत फरक जाणवला. पंधरा दिवसांनंतर माझा जो पाय निर्जीव झाला होता, नऊ महिन्यात तसूभर ही हालत नव्हता, तो इंच भर उचलता येऊ लागला. तेव्हा मला खूप आशा वाटली. आपल्यात नक्की सुधारणा होणार हा भरवसा निर्माण झाला. त्याप्रमाणे हळूहळू सुधारणा होत गेली. आता पाच महिन्यांनंतर मी माझे दैनंदिन व्यवहार कोणाच्याही मदती शिवाय करू शकते. घरातल्या घरात हिंडू फिरू शकते. मला तर हा चमत्कारच वाटतो. अशक्य गोष्ट शक्य झाली. माझ्या लुळ्या, निर्जीव पायात चैतन्य आलं. ते केवळ या प्राणिक हीलिंगमुळेच. ते एकवरदानच आहे.
इतकी प्रभावी उपचार पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहे हेच अनेकांना माहिती नाही. ज्यांनी ह्याचा शोध लावला व जे या पद्धतीचा वापर करून यशस्वी उपचार करतात त्यांना कोटी कोटी प्रणाम. विना औषध, इंजेक्शन, सर्जरी, तुलनेने कमी खर्चिक असलेली ही उपचार पद्धती आहे. यामुळे किरकोळ ते असाध्य व अपवादात्मक असलेले रोगही पूर्ण बरे होऊ शकतात किंवा सुसह्य होऊ शकतात. व्याधीनुसार वेळ लागू शकतो. उपचारावर श्रद्धा, उपचारकावर विश्वास व स्वतःची सकारात्मक प्रवृत्ती यांचा निश्चित फायदा होतो. लाखो रुपये खर्च केल्यानंतर ही निराशा पदरी पडलेली मी, आज स्वतःच्या पायावर उभी राहू शकते, माझे दैनंदिन व्यवहार करू शकते. माझ्या बाबतीत मला मार्गदर्शन करणाऱ्या निलिमाताई, मला मनोबल देणारे व अत्यंत आत्मीयतेने उपचार करणारे माझे उपचारक (थेरपिस्ट)श्री. योगेश चांदोरकर व त्यांचे गुरू श्री. वाटवे यांची मी शतशः ऋणी आहे. माझ्या प्रमाणेच अनेक व्याधीग्रस्तांना लाभ व्हावा ह्यासाठी हा लेखप्रपंच. ही(थेरपी)उपचार पद्धत तुम्ही दोन दिवसांत शिकूही शकता. जेणेकरून स्वतःवर, इतरेजनांवर घरच्या घरी उपचार करू शकता.
-मालती मराठे, पुणे.
47ए, आशिर्वाद अपार्टमेंट,
कर्वे रोड, पुणे - 411004.
फोन : 020-64001530
(फोन : स.11.00 ते संध्या. 8.00)


 ‘प्राणिक हीलिंग’ एक वरदान
एक दिवस घरी चालत यॆताना अचानक माझ्या उजव्या गुडघ्याच्या बरॊबर मागॆ शीर सटकल्यासारखी झाली व पुढचॆ पाऊल टाकणॆ कठीण झालॆ. अगदी कशीबशी घरी पोचले. त्या दिवशी मुलाची रजा असल्याने तो घरी होता. त्याने मला पाय शेकायला गरम पाण्याची पिशवी दिली. व एस पेनकिलरची गोळी दिली. थोड्या वेलाने मला बरे वाटले; परंतु दोन-चार दिवसांनी अशी परिस्थिती आली, की मी एक मिनिटसुद्धा उभी राहू शकत नव्ह्ते. सगळ्या प्रकारचे डॉक्टर झाले. एक्स-रे झाले. एम.आर.आय. झाले. डॉक्टरांचा सल्ला होता, की ऑपरेशन करायला पाहिजे. दररोज दहा ते पंधरा गोळ्या खाऊन आणि डॉक्टरांनी सांगितलेले व्यायाम करून ही काहीच उपरोग होत नव्हता. म्हणून ऑपरेशनचा निर्णय घेतला. खर्च कमीत कमी 40,000 रु. येणार होता. डॉक्टरांना विचारले, "एवढा खर्च करून बरे वाटेल का?'' तर डॉक्टर  म्हणाले,"बरे वाटायला पाहिजे.'' म्हणजे खात्री नव्हती. शेवटी डॉक्टर मैत्रिणीचा सल्ला घेतला. तिने व्यवसाय बाजूला ठेवून मोलाचा सल्ला दिला, तो म्हणजे व्यायाम व योगासने सुरू करा.
व्यायाम सुरू केले. दोन-चार वेळा गेल्यावर फरक जाणवला. व्यायामाच्या बरोबरीने होमिओपॅथी, आयुर्वेदिक औषधे सुरू केली. तसेच अम्रुतांजन, अम्रुतांजन स्टॉक, ड्रॅगॉन यांचाही मनसोक्त वापर चालूच होता. दोन-तीन महिन्यांनी अचानक डाव्या पायाचीही शीर दुखावली. म्हटलं आता काही खरं नाही. पूर्ण निराश झाले. गावात राहायला असताना जवळ जवळ 15 ते 20 वर्षे पर्वती चढणारी व आता सनसिटी (सिंहगड रोड, पुणे)जवळ राहायला आल्या नंतर राजाराम पुलापय्रंत चालत जाणारी मी, चार पावलं सुद्धा टाकू शकत नव्हते.
पण या सगळ्यातून जणू बरे होण्यासाठी एक मार्ग सापडला. एका मैत्रीणीने श्री. योगेश चांदोरकरांकडून प्राणशक्ती उपचार पद्धतीने उपचार घेण्याचा सल्ला दिला. मी ही उत्सुकतेने उपचारांना सुरूवात केली. एका वेळच्या उपचारानेच मला 15 ते 20 टक्के गुण आला. त्यानंतर पुढे चार-सहा वेळा उपचार झाल्यानंतर जवळ-जवळ 90 टक्के गुण आला. मला उभे राहता येऊ लागले. चालता येऊ लागले. जादूची कांडी फिरवावी तसे झाले. खूपच दिलासा मिळाला. मी आश्चर्यचकित झाले. जी गोष्ट अन्य वैद्यकीय उपारांनी झाली नाही ती या उपचाराने शक्य झाली. आता मी पाऊण ते एक तास चालू शकते. प्राणिक हीलिंग मुळे मला एक वरदानच मिळाले.
हा लेख लिहिण्यामागचा उद्देश एकच, की ही उपचार पद्धती कमी वेळाची, विना औषधाची, विना स्पर्शाची आणि त्या मानानी कमी खर्चाची असल्याने ज्यांना माहित नाही, त्यांना माहिती व्हावी. या दोन मिनिटांच्या उपचाराने अनेक आजार बरे झाल्याची आश्चर्यकारक उदाहरणे ओहत फक्त रुग्णाने मनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, सातत्याने उपचार घ्यावेत.
मोठमोठी फी व भरमसाठ औषधे घेऊनसुद्धा गुण न येणे हा माझा अनुभव आहे. पण प्राणिक हीलिंगच्या उपचाराने मला खरोखर संजीवनी मिळाली. या उपचारांबरोबर होमिओपॅथी व आयुर्वेदिक औषधे, अय्यंगारांचे व्यायाम यांनाही बरे होण्याचे श्रेय आहे. माझ्या आजारपणात माझ्या यजमानांनीही फार मोलाची साथ दिली. आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे ही उपचार पद्धती कोणीही सारान्य माणूस शिकू शकतो. व कमीत कमी आपल्या घरच्यांवर उपचार करू शकतो. मी सुद्धा शिकले आहे. हा लेख संपविताना माझी अशी विनंती आहे, की या उपचारपद्धतीचा अवश्य अनुभव घ्यावा.
  - निलिमा रिसबुड, पुणे.